‘आमदार अपात्रतेबाबत कोणताही निर्णय नको’

0
15

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले.

आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत व इतर याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, काल ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती केली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश दिले.