निवडून आणलेल्यांना फोडू शकाल; पण निवडून देणार्‍यांना फोडून दाखवा

0
9

>> उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आव्हान

शिवसेना ही मर्दांची सेना आहे. ज्या ज्या वेळी आपल्याला कोणी आव्हान दिले, त्या त्या वेळी आपण त्यांना संपवून पुढे गेलोय. गद्दारांना शिवसेनेत स्थान नाही. तुम्ही निवडून आणलेल्यांना फोडू शकाल, पण निवडून देणार्‍यांना फोडून दाखवा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना दिले.
जो शिवसैनिक माझ्यासोबत राहील, त्याच्या सोबतीने मी पुन्हा शिवसेना उभी करेन, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. शेराला सव्वाशेर मिळतोच. शिवसेना ही तळपणारी तलवार आहे, ती म्यानात घातली तर गंजते आणि बाहेर काढली, तर तळपते. तीच आता वेळ आली आहे. शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केले आणि आपल्याच लोकांनी पाइीत खंजीर खुपसला, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी बंड केलेल्या आमदारांना इशारा देताना सांगितले की, माझ्या तब्येतीचे, आजारपणाचं कारण शोधून तुम्ही जर बंड करणार असाल ते अयोग्य आहे. या बंडाच्या मागे मी आहे, असा संदेश पोहोचवला जातो; पण मी शिवसेनेमध्ये गद्दारी करणार नाही. आज जर वेगळा तुम्ही गट स्थापन केला आणि नंतर तो फुटला तर तुमची आमदारकी रद्द होणार. त्यामुळे शिवसेनाही संपेल आणि तुम्हीही संपाल. आज जे निवडून आले आहेत, त्यांना पुन्हा निवडून येणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.