‘अग्निपथ’ योजनेविरोधात आगडोंब

0
33

सैन्य दलांत भरतीसाठी मोदी सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजने बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह, उत्तराखंड, हरयाणा या राज्यांतील युवकांनी जोरदार आक्षेप घेत काल जाळपोळ केली. अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर काल देशभरात ठिकठिकाणी युवक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन केले. बिहारमधील संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्स्प्रेस ट्रेनला आग लागली.