राष्ट्रपतींच्या हस्ते १५ रोजी नव्या राजभवनाची कोनशिला

0
20

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या १३ ते १५ जून या दरम्यान कर्नाटक व गोव्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. राष्ट्रपती १३ जून रोजी बंगळुरू येथील राष्ट्रीय लष्करी प्रशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर १४ रोजी बंगळुरू येथील वसंतपुरा भागात वैकुंठ हिल परिसरात श्री राजाधिराज गोविंद मांडेराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींचा गोवा दौरा हा १५ जून रोजी असून या दिवशी ते दोनापावला येथे नव्या राजभवन इमारतीसाठीची कोनशिला बसवणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीकडे प्रयाण करतील.