भारतीय हवाई दल बनवणार १०० प्रगत लढाऊ विमाने

0
41

>> ‘मेक इन इंडिया’ला मिळणार चालना

भारतीय हवाई दल भारतात सुमारे १०० प्रगत लढाऊ विमाने बनवण्याची योजना आखत आहे. ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी ही योजना आखली जात असून या योजनेसाठी हवाई दलाने जागतिक विमान उत्पादकांशी बोलणी सुरू केली आहे.
या प्रकल्पातील सुमारे ७० टक्के रक्कम फक्त भारतीय चलनात भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. या योजनेअंतर्गत भारतात ९६ विमाने बनवली जातील. यामध्ये ३६ विमानांचा आर्थिक व्यवहार भारतीय आणि विदेशी चलनात केला जाईल. तर ६० विमानांचा व्यवहार फक्त भारतीय चलनात केला जाणार आहे.

आणखी विमान खरेदीची योजना
आयएएफ ११४ विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे सैन्याची लढाऊ क्षमता वाढणार आहे. बोईंग, लॉकहीड मार्टिन, एमआयजी, डसॉल्ट आणि साब यांसारख्या कंपन्या या प्रकल्पाच्या शर्यतीत आहेत. तसेच मिग विमानाची जागा नवीन लढाऊ विमान घेणार आहेत. या प्रकल्पातील सुरुवातीची १८ विमाने परदेशी विक्रेत्यांकडून घेतली जातील. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

आयएएफने १२६ नवीन लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी २००७ मध्ये पहिल्यांदा मिडीयम मल्टी-रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट निविदा काढली. मात्र हा प्रकल्प रद्द करून सरकारने त्याऐवजी ३६ राफेल विमाने घेतली.