योग्य ती निविदा प्रक्रिया पूर्ण न करता दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणा (एसजीपीडीए) ला जे सोपो गोळा करण्याचे कंत्राट दिले आहे, त्यासंबंधी राज्य सरकार चौकशी करणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली.
मडगाव येथे सोपो गोळा करण्याचे काम कोणतीही निविदा न काढता एसजीपीडीएला देण्यात आले असल्याची माहिती आपल्या हाती आली असून, या प्रकरणाची नगरविकास खात्यातर्फे चौकशी करण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी सदस्य सचिव व अन्य संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सोपोसाठी निविदा काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर सदस्य सचिवांनी निविदा न काढताच एसजीपीडीएला सोपो कंत्राट दिले असल्याचे राणे यांनी सांगितले.