यूरोलॉजी, न्यूरोसर्जर विभाग सुरू करणार : राणे

0
18

दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी विभाग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल एका ट्विट संदेशाद्वारे दिली.

आरोग्य खात्याच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या एका बैठकीत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात न्यूरोलॉजी विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसात न्यूरोलॉजी विभाग सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच या विभागात ओपीडी सुरू होणार आहे.