>> मत्स्योद्योग खात्याकडून जाहीर
राज्य सरकारच्या मत्स्योद्योग खात्याने ‘सागरमित्र’ पदाच्या भरतीसाठी कोकणी भाषेचे ज्ञान अनिवार्य असल्याचे अखेर काल जाहीर केले.
मत्स्योद्योग खात्याने काही दिवसांपूर्वी सागरमित्र पदाच्या भरतीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिरातीमध्ये कोकणी भाषेचे ज्ञान अनिवार्य असल्याचे नमूद केले नव्हते, तर स्थानिक भाषेचे ज्ञान अनिवार्य असा मोघम उल्लेख केला होता. गोवा फॉरवर्डने कोकणी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात न आल्याने त्या जाहिरातीला आक्षेप घेतला होता. तसेच गोवा फॉरवर्डच्या एका शिष्टमंडळाने मत्स्योद्योग खात्याच्या अधिकार्यांना यासंबंधीचे एक निवेदन सादर करून जाहिरातीत आवश्यक दुरुस्ती करून ती प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती.
आत मत्स्योद्योग खात्याने शुद्धीपत्रकाद्वारे जाहिरातीमध्ये दुरुस्ती केली आहे. सागरमित्र पदासाठी येत्या ७ जून रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राज्यातील मच्छिमारी बांधवांना साहाय्य करण्यासाठी सागरमित्रांची नियुक्ती केली जात आहे.