राज्यात स्थायिक झालेल्या कन्नड म्हणजेच कर्नाटक राज्यातील लोकांना आता गोव्यात सत्तास्थानी येण्याची स्वप्ने पडू लागलली असून, राज्यातील आगामी पंचायत निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवण्याचा निर्णय गोवा कन्नड महासंघाने घेतला आहे.
गोवा पंचायत निवडणूक रिंगणात आपले पॅनल असेल, असे गावा कन्नड महासंघाने स्पष्ट केले आहे. मुरगाव, बार्देश, डिचोली, फोंडा आदी तालुक्यांतील पंचायतींमध्ये निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष सिद्धाण्णा मेती यांनी काल स्पष्ट केले. या घोषणेमुळे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.