येथील गांधी मार्केट परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाखालील एका आलिशान दुकानात सुरू असलेल्या एका मिनी कॅसिनोवर काल मडगाव पोलिसांनी छापा टाकून ९ जणांना अटक केली. या धडक कारवाईत पोलिसांनी अडीच लाखांचा माल जप्त केला.
काल सायंकाळी मडगावचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवाई केली. यावेळी या जुगार अड्ड्यावर सात जण जुगार खेळण्यासाठी आले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच कॅसिनो चालवणार्या दोन ऑपरेटर्सना अटक केली. पोलिसांनी या छाप्यात १० संगणक व रोख रक्कम असा अडीच लाखांचा माल जप्त केला.