बेरोजगारीत गोवा देशात पाचव्या स्थानी

0
16

बेरोजगारीच्या बाबतीत गोवा देशात पाचव्या क्रमांकावर असून, राज्यातील बेरोजगारीची टक्केवारी ही १५.५ टक्के एवढी असल्याची आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जाहीर केली आहे.

नुकत्याच संपलेल्या एप्रिल महिन्यात गोव्यात बेरोजगारीची टक्केवारी ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. एप्रिलमधलल बेरोजगारीची राष्ट्रीय सरासरी ही ७.८ टक्के एवढी आहे. बेरोजगारीच्या बाबतीत सर्वात वरचा क्रमांक हा हरियाणा राज्याचा असून, तेथील बेरोजगारीची टक्केवारी ही तब्बल ३४.५ टक्के एवढी आहे. त्यापाठोपाठ राजस्थानातील बेरोजगारीची टक्केवारी ही २८.८ टक्के एवढी आहे. तिसरा क्रमांक हा बिहारचा असून, तेथील बेरोजगारीची टक्केवारी ही २१.१ टक्के एवढी आहे. १५.६ टक्क्यांसह जम्मू-काश्मीर चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या स्थानी आपले गोवा राज्य असून, राज्यातील बेरोजगारीची टक्केवारी ही १५.५ टक्के एवढी आहे.