देशाची सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत दुष्प्रचार केल्याच्या आरोपावरून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १६ यू-ट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे. त्यात १० भारतीय आणि ६ पाकिस्तानी यू-ट्यूब चॅनलचा समावेश आहे. सरकारने आयटी नियम, २०२१ अंतर्गत ही कारवाई केली आहे. या यू-ट्यूब चॅनलची एकूण व्ह्यूअरशिप ६८ कोटींपेक्षा जास्त होती. त्यांच्यावर लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, खोटी माहिती देणे असे आरोप आहेत. याआधी केंद्र सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला २२ यू-ट्यूब चॅनलवर बंदी घातली होती, त्यात पाकिस्तानी चॅनेल होते.