पहिल्या ५ वर्षांत १५०० कायदे रद्द : मोदी

0
19

आपल्या देशात शेकडो कायदे होते, जे नागरिकांसाठी ओझे बनले होते. पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्या ५ वर्षांत मी १५०० कायदे रद्द केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. पंतप्रधानांनी नागरी सेवा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय लोकशाही संदर्भात देखील मोदींनी महत्त्वाचे विधान केले. आपण एका लोकशाही राज्यव्यवस्थेत आहोत.

आपण आपल्यासमोर तीन उद्दिष्ठ ठेवली पाहिजेत. पहिले उद्दिष्ठ देशातील सामान्य माणसाच्या जीवनात बदल आणि बदलाची जाणीव त्यांना करून देणे हे आहे. दुसरे उद्दिष्ठ म्हणजे आपण भारतात जे काही करू ते जागतिक दर्जाचे असले पाहिजे. तिसरे म्हणजे व्यवस्थेत आपण कुठेही असो, ज्या व्यवस्थेतून आलो आहोत. त्यामध्ये आपल्या देशाची एकता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी असल्याचे मोदी म्हणाले.