आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

0
18

>> केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी

केंद्रीय गृहमंत्रालयाने आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश काल जारी केला असून, गोव्यातील ६ आयएएस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे, तर एका आयपीएस अधिकार्‍याची बदली करण्यात आली आहे. त्यानंतर गोव्यात नव्या चार आयएएस अधिकार्‍यांची आणि दोन आयपीएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रालयाने आयएएस अधिकारी व्ही. कांडावेलू, सुभाष चंद्रा, संजीव आहुजा आणि संदीप जॅकीस यांची गोव्यात बदली केली आहे. गोव्यात कार्यरत असलेले आयएएस अधिकारी संजय गिहार, डॉ. तारिक थॉमस, चोखा राम गर्ग, विवेक एच. पी., वंदना राव आणि हेमंत कुमार यांची गोव्यातून अन्यत्र बदली केली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अन्य एका आदेशाद्वारे गोव्यात दोन आयपीएस अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज गोव्यात परतणार आहेत. गोव्यातील पोलीस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांची आयपीएस म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अरुणाचल प्रदेशामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. आता, बॉस्को जॉर्ज यांची गोव्यात बदली करण्यात आली आहे. ओमवीर सिंग यांची चंदीगड येथून गोव्यात बदली करण्यात आली आहे, तर गोव्यातील आयपीएस अधिकारी परमादित्य यांची दिल्ली येथे बदली केली आहे.