राज्य सरकारने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची काल एका अधिसूचनेद्वारे गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळा (जीएसआयडीसी) च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ हे एक अत्यंत महत्त्वाचे असे महामंडळ असून, पुलांसह सर्व महत्त्वाच्या पायाभूत साधनसुविधा व विकास प्रकल्प उभारण्याचे काम या महामंडळाच्या माध्यमातून होत असते.