राज्यातील काही भागांत ५ व ६ रोजी पाऊस

0
11

उद्या मंगळवार दि. ५ व परवा बुधवार दि. ६ एप्रिल रोजी राज्यातील काही भागांत गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यावेळी ताशी ४० ते ५० किमी या वेगाने वारेही वाहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यातही राज्यातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. तसेच राज्यात उष्णतेचीही लाट आली होती. त्यामुळे दुपारच्या उन्हात घरातून बाहेर पडणेही गोमंतकीयांसाठी कठीण बनले होते. उष्णतेचा पारा आताही वाढलेलाच असून या पार्श्‍वभूमीवर राज्य हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील काही भागांत हा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केलेले आहे.