कॉंग्रेस पक्षाच्या विधिंडळ गटाच्या नेतेपदी मायकल लोबो यांची निवड करण्यात आली आहे. तर, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून अमित पाटकर यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी युरी आलेमाव याची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या उपनेतेपदी संकल्प आमोणकर यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार कार्लुस परेरा यांची मुख्य व्हिप म्हणून निवड करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हाध्यक्षपदी वीरेन शिरोडकर आणि दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदी सावियो डिसिल्वा यांची निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाने २१ दिवसानंतर विधिमंडळ नेत्याची निवड केली आहे.