>> महिन्याभरात २८१ बाधित, ११ जणांचा मृत्यू
राज्यात मार्च महिन्यात नवीन कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या महिनाभरात नवीन २८१ बाधित आढळून आले असून ११ जणांचा बळी गेला आहे. या मार्च महिन्यात ३२ हजार ४११ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर, ५१२ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
दरम्यान, राज्यात मागील चोवीस तासांत नवीन १२ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आणखी कोरोना बळींची नोंद झाली नाही. राज्यातील कोरोनाबाधित सक्रिय रूग्णसंख्या २९ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ५९३ स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यातील १२ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३२ एवढी आहे.
राज्यात मागील चोवीस तासांत आणखी ७ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४३ टक्के एवढे आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत एकाही नवीन कोरोनाबाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेले नाही.