>> कंत्राटदाराने पगार न दिल्याने मजूर संतप्त
मोप विमानतळाच्या इमारतीचे बांधकाम करणार्या कंत्राटदाराने मजुरांचे पैसे न दिल्याने तेथे उपस्थित असलेल्या सुमारे पाचशे मजुरांनी संतप्त होऊन अनेक वाहनांची मोडतोड केली. तसेच कार्यालयात दगडङ्गेक केल्याची घटना काल बुधवार दि. १६ रोजी सकाळी घडली. परंतु या विरोधात पोलिसांत रात्री उशिरापर्यंत एकही तक्रार नोंद झाली नाही.
मोप विमानतळ परिसरातील विविध बांधकामांचे कंत्राट मेगा व्हाईट या कंपनीला दिले आहे. या कंपनीतर्फे जे कामगार काम करतात ते सर्व गोव्याबाहेरील आहेत. कंत्राटदाराने या कामगारांना पगार न दिल्यामुळे हे कामगार संतप्त झाले व त्यांनी दिसेल त्या वाहनांवर दगडङ्गेक करून अनेक वाहनांची मोडतोड केली. यात बहुतांश गोव्यातील भाड्याच्या वाहनांना त्यांनी लक्ष्य केले. मात्र बाहेरील राज्यातील अनेक वाहने या परिसरात आहेत त्यांच्यावर कामगारांनी अजिबात हल्ला केला नाही. फक्त गोव्यातीलच वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच काही प्रशासकीय इमारतींवरही दगडङ्गेक करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु उशिरापर्यंत पोलिसांकडे एकही तक्रार आलेली नव्हती. त्यामुळे अजून कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली.
होळी सणासाठी या कामगारांनी पगाराची गरज होती. मात्र कंत्राटदाराने त्यांना पगार दिला नाही अशी माहिती काही कामगारांनी दिली. या संदर्भात कामगारांनी सांगितले की, आम्ही युनिक कंपनीचे कामगार आहोत आणि आम्हाला मागच्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्या कामगारांना ही पगार देण्यास कंपनीने टाळाटाळ केल्याने यावेळी उपस्थित मजूर संतप्त झाले आणि त्यांनी वाहनांवर दगडफेक सुरू केली. या घटनेत नेमकी किती वाहनांची तोडफोड केली, तसेच कोणकोणत्या इमारतीवर दगडङ्गेक केली याची माहिती अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
दरम्यान, काल घडलेल्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आले होते. परंतु त्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला.
पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ज्या कामगारांना कंपनीने पगार दिला नाही त्या कंपनीच्या अधिकार्यांकडे चर्चा करून आपण आता प्रत्येक कामगारांचा पगार त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रयत्न केलेले आहेत. कामगारांचा पगार वेळेवर न मिळाल्यानेे कामगार संतप्त झाल्याचे सांगितले.