कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर काल मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल देताना हिजाब हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणार्या विविध याचिका ङ्गेटाळून लावल्या.
१४४ कलम लागू
या निर्णयापूर्वी बेंगळुरूमध्ये २१ मार्चपर्यंत मेळावे, आंदोलने, सार्वजनिक ठिकाणी निदर्शने किंवा उत्सवांवर बंदी घालण्यात आली असून अनेक जिल्ह्यांत १४४ कलम लागू केले आहे.