मडगाव अर्बन बँकेच्या खातेदारांवर फार मोठे संकट कोसळले असून, बँकेच्या सर्व ९ शाखा दि. १ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बँकेने काल एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले.
मडगाव अर्बन बँकेच्या गोव्यात ९ शाखा असून, त्यात व्यवहार सुरू होते. दि. २७ जुलै २०२१ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मडगाव अर्बन बँकेचा परवाना रद्द केला. त्यामुळे हजारो खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यानंतर रिझर्व बँकेच्या आदेशानुसार सहकारी संस्थेच्या निबंधकांनी बँकेवर प्रशासक नियुक्त केला होता. त्यांनी ज्यांच्या ठेवी बँकेत आहेत व ज्या खातेधारकांच्या खात्यात पैसे आहेत, त्यांनी ते परत मिळविण्यासाठी अर्ज करावे, असे जाहीर केले होते.
बर्याच लोकांनी अर्ज करूनही अजून रक्कम परत मिळाली नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच खात्यातून पैसे काढण्यासही मर्यादा घातल्याने अनेक सर्वसामान्य लोक व मध्यम वर्गीयांचे हाल झाले होते. आता बँकेच्या शाखा बंद झाल्यानंतर खातेदारांना फटका बसणार आहे. तसेच बँकेतील कर्मचार्यांना देखील नोकरीला मुकावे लागणार आहे.