विश्वजीत राणे आणि नीलेश काब्राल असे दोघेच उमेदवार भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी पात्र आहेत, असे मत मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना नोंदवले.
राजकीय पक्षांनी मुख्यमंत्रिपदासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या नेत्याची निवड केली पाहिजे. भाजपचे नेते विश्वजीत राणे आणि आपण चार दिवसातून एकदा भेटत असतो, असेही ढवळीकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीचानिकाल जाहीर झाल्यानंतर कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
निवडणूक कामकाजात भाग घेतलेल्या सरकारी कर्मचार्यावर टपाल मतासाठी नेते आणि राजकीय पक्षांकडून दबाव टाकला जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालयाने टपाल मतपत्रिका रद्द करून मामलेदार कार्यालयात ईव्हीएम मशीन ठेवून त्या सरकारी कर्मचार्यांसाठी मतदानाची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी ढवळीकर यांनी केली.