ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी उर्फ संध्या मुखोपाध्याय यांचे काल कोलकाता येथील रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. २७ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत सरकारने यंदा संध्या मुखर्जी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. मात्र हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिल्याने संध्या मुखर्जी या चर्चेत आल्या होत्या.