एबीजी संचालकांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

0
9

बँक इतिहासातील सर्वात मोठ्या २२८४२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात सीबीआयने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. सीबीआयने एबीजी शिपयार्ड कंपनी तसेच कंपनीच्या संचालकांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

आरोपी देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता लक्षात घेत सीबीआयने हे पाऊल उचलले आहे. हा घोटाळा एप्रिल २००५ ते जुलै २०१२ यादरम्यान झाल्याचे सीबीआयने अधिकृतरित्या सांगितले आहे. एबीजी शिपयार्ड कंपनीने सर्व नियमांना फाटा देत अनेक बँकांमध्ये फसवणूक केली आहे.