लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रा यांना जामीन मिळाल्याने आता याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजय मिश्रा यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकर्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. आशिष मिश्रा याला ९ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या ५ महिन्यांपासून तो तुरुंगात होता.