घराणेशाही हा भारतीय लोकशाहीचा शत्रू : मोदी

0
31

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसवर निशाणा साधला. तसेच घराणेशाहीवर भाष्य केले. प्रत्येक राज्यात घराणेशाही चालवणारे पक्ष असून, घराणेशाही चालवणारे पक्ष फक्त कुटुंबाचाच विचार करतात, देशाचा नाही. त्यामुळे भारतीय लोकशाहीसाठी घराणेशाही हा सर्वात मोठा शत्रू आहे, असे मोदी म्हणाले.

देश संपला तरी चालेल, पक्ष लयास गेला तरी चालेल; पण आपली घराणेशाही कायम राहिली पाहिजे, अशी मानसिकता असेल तर तिथे गुणवत्तेला मोल उरत नाही. म्हणून ही घराणेशाही झुगारली पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

देशाची आज जी अवस्था आहे, त्याला कॉंग्रेस कारणीभूत आहे. अटलजी आणि मी सोडलो, तर आजवरचे सगळेच पंतप्रधान कॉंग्रेसच्या शाळेत घडलेले होते. जातीयवाद, भाषिक वाद, प्रांतवाद आणि भ्रष्टाचार याच्यातच देश इतकी वर्षे गुरफटला असून, त्याला केवळ आणि केवळ कॉंग्रेस जबाबदार आहे, असे मोदी म्हणाले.

तसेच पाच राज्यातल्या निवडणुका भाजपच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.