डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत आहे. त्याला सोमवारी दोन आठवड्यांसाठी फरलो मंजूर करण्यात आला, असे अधिकार्यांनी सांगितले. या काळात डेरा प्रमुखाला त्याच्या गुरुग्राम येथील फार्महाऊसवर राहण्यास सांगण्यात आले आहे, त्याला सिरसा येथे जाऊ दिले जाणार नाही. त्याला ७ ते २० फेब्रुवारीपर्यंत फरलो देण्यात आला आहे.