शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग

0
10

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करून या संदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली, तरी काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही पवार यांनी केली आहे. दरम्यान, खासदार दिग्विजय सिंह यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.