महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणाची तक्रार निकालात

0
10

माजी मंत्री तथा आमदार मिलिंद नाईक यांच्याविरोधात संकल्प आमोणकर यांनी पणजी महिला पोलीस स्थानकात एका महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी दाखल केलेली तक्रार चौकशीनंतर निकालात काढण्यात आली आहे.

कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एका महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी मिलिंद नाईक यांचे नाव जाहीर केले होते. त्यानंतर कॉँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी पणजी महिला पोलीस स्थानकात नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. वास्को येथील विभागीय पोलीस अधिकार्‍यांनी तक्रारीबाबत सखोल चौकशी केली. पीडित महिलेने संकल्प आमोणकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले, असे महिला पोलीस स्थानकातील पोलिसांनी आमोणकर यांना पाठविलेल्या एका पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, मिलिंद नाईक यांना लैंगिक शोषण प्रकरणातून वाचविण्यासाठी भाजप माझ्याविरोधात कटकारस्थान रचत आहे, असा आरोप संकल्प आमोणकर यांनी केला आहे.