देशभरात चोवीस तासांत ३७,३७९ कोरोनाबाधित

0
6

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ३७९ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १२४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार ७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ही १ लाख ७१ हजार ८३० झाली असून कोरोनामुळे आतापर्यंत देशात ४ लाख ८२ हजार १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.