वाढत्या ओमिक्रॉन रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) दौरा रद्द केला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या अनेक देशांवर सध्या ओमिक्रॉनचे संकट असल्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जानेवारीच्या आसपास संयुक्त अरब अमिरातीला जौणार होते. २०२२ मधील पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. पंतप्रधानांची दौर्याची तारीख निश्चित झाली नव्हती. दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांना ५० वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा होत होता. मात्र, अखेर ओमिक्रॉनच्या संकटामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
या दौर्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुबई एक्स्पोला भेट देणार होते. तसेच भारत – यूएई मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी देखील करणार होते. त्यामुळे पंतप्रधानांचा हा दौरा ऐतिहासिक ठरणार होता.