लुधियानातील स्फोटामागे बब्बर खालसाचा हात असल्याचा संशय

0
12

पंजाबच्या लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलात गुरुवारी झालेल स्फोटामध्ये एकाच्यामृत्यूसह सहाजणजखमी झाले. न्यायालयाचे कामकाज सुरू असतानाच दुसर्‍या मजल्यावरील स्वच्छतागृहात हा स्फोट झाला. या स्फोटामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय असून यामागे पाकिस्तानचे समर्थन असणारी बब्बर खालसा ही संघटना असल्याचा संशय आहे.

स्फोटाच्या हादर्‍याने इमारतीच्या भिंतीचे नुकसान झाले असून, काही वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळी नमुने गोळा केले, असे लुधियानाचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सांगितले. हा आईडी स्फोट असल्याचा प्राथमिक अंदाज असून स्फोटानंतर राज्यात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.