भाजपच्या संकल्प रथयात्रेचा नड्डा यांच्या हस्ते शुभारंभ

0
20

भाजप सरकारच्या दहा वर्षातील विकास कार्याची माहिती देणारा अहवाल आणि संकल्प रथयात्रेचा शुभारंभ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते काल येथे करण्यात आला. यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, वीजमंत्री नीलेश काब्राल आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजप सरकारकडून गोव्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. या विकास प्रक्रियेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी भारताची गणना भ्रष्टाचारी देशांत होत होती. पंतप्रधान मोदी यांनी भारताची ही प्रतिमा बदलण्याचे काम केले. गोव्यातील गुन्ह्यांच्या प्रकरणाच्या तपासाची टक्केवारी ९३ टक्के एवढी आहे. अमलीपदार्थांच्या गैरव्यवहारावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे, असेही नड्डा यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मुख्यमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, जलक्रीडा (वॉटर स्पोट्‌र्स) प्रकल्प येत्या मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. एनआयटी प्रकल्प ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण होणार आहे. पणजी शहराला बिझनेस सिटी बनविण्यात येणार आहे. संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत, असे सांगितले.