दाबोळी विमानतळावर यूएईमधून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ओमक्रॉनच्या तपासणीसाठी प्रवाशाच्या स्वॅबचा नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. यूएईमधून एकूण १० प्रवासी आले होते. त्या सर्वांची तपासणी केली असता एक प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.