नोकरभरतीप्रकरणी हस्तक्षेप करावा

0
13

>> गोवा फॉरवर्डची मागणी

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची गोवा फॉरवर्ड पक्षाच्या एका शिष्टमंडळाने काल बुधवारी भेट घेऊन राज्यातील नोकरभरती गैरव्यवहारात हस्तक्षेप करण्यासाठी एक निवेदन सादर केले.

गोवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना सरकारच्या नोकरभरतीसंबंधीचा अहवाल मागवण्याचे आवाहन केले. गोवा फॉरवर्डचे संघटक दुर्गादास कामत यांनी नोकरभरतीमधील गैरप्रकाराची माहिती दिली. यावेळी पक्षाच्या उपाध्यक्ष रेणुका डिसिल्वा, ऍड. आश्मा बी व इतरांची उपस्थिती होती.

राज्यपालांनी नोकरभरती प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे कामत यांनी सांगितले. नोकरभरतीच्या परीक्षेत फेरफार करणार्‍या अधिकार्‍यांची नावेही राज्यपालांकडे देण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यातील सुमारे २७ तांत्रिक साहाय्यक अजूनही नियमित होण्यासाठी धडपडत आहेत. सरकारने त्यांची मागणी बाजूला सारून नवीन पदांची भरती सुरू केली आहे, असेही कामत यांनी सांगितले.