दाबोळी विमानतळावर शुक्रवारी सकाळी मूळ गोव्यातील ४१ वर्षीय ब्रिटीश नागरिकासह अन्य तिघे असे एकूण चौघेजण काल कोविड पॉझिटिव्ह सापडले.
पॉझिटिव्ह सापडलेल्या मूळ गोमंतकीय ब्रिटीश नागरिकाच्या चाचणीचे नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्यात पाठवले आहेत. अहवाल येईपर्यंत तिला कांसावली येथील सरकारी इस्पितळात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान यूकेहून शुक्रवारी सकाळी गोव्यात आलेल्या एआय१४६ विमानातील ३ प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. या विमानात एकूण २३७ प्रवासी होते. इतर प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आले. ज्या प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यांना गृह विलगीकरणात ठेवले जाणार असून कोविडची लक्षणे आढळल्यास ८ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी त्यांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, दाबोळी विमानतळावर येणार्या प्रवशांसाठी रॅपिड पीसीआर चाचण्यांचे दर गुरुवार दि. ९ पासून घटवण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे.
रॅपिड पीसीआर चाचणीसाठी ३२०० रुपये आकारले जात होते. आता २४०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.