रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे भारतात आगमन झाले असून, दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पुतिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल भेट झाली. यावेळी मोदी यांनी पुतिन यांच्याशी हस्तांदोलन केले व गळाभेट घेत त्यांचे अगत्याने स्वागत केले.
त्यानंतर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली व त्यात भारत-रशिया मैत्रीवर जोर दिला गेला. ही मैत्री भविष्यात अधिक घट्ट होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला गेला. भारत-रशिया यांच्यातील २१ व्या शिखर संमेलनासाठी पुतिन भारतात आले आहेत.
जागतिक पातळीवरील अनेक घडामोडी, बदलती स्थिती आणि कोरोना संकट या सगळ्याच पार्श्वभूमीवर पुतिन यांची भारत भेट महत्त्वाची आहे.