लष्कराच्या तुकडीविरुद्ध नोंदवला एफआयआर

0
11

>> १४ नागरिकांचे हत्या प्रकरण

नागालँडमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये शनिवारी रात्री सहा खाण मजुरांसह १४ नागरिक ठार, तर ११ हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी आता नागालँड पोलिसांनी भारतीय लष्कराच्या २१ पॅरा विशेष दलाच्या तुकडी विरोधात स्वत: दखल घेत एफआयआर नोंदवला आहे.

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची ग्वाही दिली असून. सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

उच्चस्तरीय चौकशी होणार : अमित शहा
भारतीय लष्कराने नागालँडमध्ये झालेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मेजर जनरल दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट ऑफ इंक्वायरी होणार आहे. तसेच या घटनेच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेत दिली.