पगारवाढीच्या घोषणेनंतरही एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरूच

0
18

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांना आतापर्यंतची सर्वात मोठी अशी ४१ टक्के पगारवाढ देत संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, राज्य शासनाच्या पगारवाढीच्या प्रस्तावावर विचार करून संप मिटवावा की सुरूच ठेवावा याबाबत आज गुरूवारी निर्णय घेण्यात येईल, असे आमदार सदाभाऊ खोत यांनी संपकरी एसटी कर्मचार्‍यांच्या वतीने स्पष्ट केले आहे.

सदाभाऊ खोत यांनी संपाचा निर्णय संपकरी कर्मचार्‍यांशी बोलूनच जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले आहे. मात्र, पगारवाढीच्या घोषणेनंतरही कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करत असलेले संपकरी पगारवाढीवर खुश नसल्याचे दिसून येत आहे.