राज्यात चोवीस तासांत आणखी कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र गेल्या चोवीस तासांत राज्यात नवीन ४१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३७ एवढी झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.९२ टक्के एवढी आहे. काल कोरोनाची लक्षणे जाणवल्याने एका रुग्णाला इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले असून एका रुग्णाला घरी पाठविण्यात आले आहे.