जवान सीमेवर सज्ज असल्यामुळेच देश निश्‍चिंत झोपू शकतो ः मोदी

0
32

>> पंतप्रधानांची जवानांसोबत राजौरीमध्ये दिवाळी

जवान सीमेवर ठाण मांडून सज्ज असल्यामुळेच संपूर्ण देश निश्चिंत झोपू शकतो. आपले जवान हे देशाचे सुरक्षा कवच आहेत. तुमच्यामुळे देशात शांती आणि सुरक्षा कायम आहे. वीरतेचे हेच जिवंत प्रतीक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल गुरूवारी दीपावली उत्सवानिमित्त जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरामध्ये दाखल झाले. येथे भारतीय लष्कराच्या जवानांसोबत पंतप्रधान मोदी आपली दिवाळी साजरी केली. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, नौशेरामध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या प्रथम पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यानंतर थेट जवानांशी संवाद साधत त्यांनी जवानांची विचारपूस केली. यावेळी, सेना अधिकार्‍यांची जवानांची भेट घेताना पंतप्रधानही उत्साहात होते. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे जवानांच्या चेहर्‍यावरही आनंद दिसत होता.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, जवान हेच आपले कुटुंब असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळेच मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो असल्याचे मोदी म्हणाले. या अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण याच कुटुंबासोबत दिवळी साजरी केली होती. आणि आता पंतप्रधान म्हणूनही आपण याच कुटुंबासोबत आपली दिवाळी साजरी करत आल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी, पंतप्रधानांनी अगोदरच्या कॉंग्रेस सरकारवरही निशाणा साधला. देशाच्या जवानांसाठी जेव्हाही हत्यारे खरेदी करण्याची वेळ येई तेव्हा तेव्हा आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता देशातच अत्याधुनिक हत्यारे तयार होत असल्याचे मोदी म्हणाले.

आठव्यांदा जवानांसोबत दिवाळी
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत आठव्यांदा दिवाळी साजरी करत आहेत. मे २०१४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यावर्षी २०१४ मध्ये पंतप्रधानांनी आपली पहिली दिवाळी सियाचिनमध्ये जवानांसोबत साजरी केली होती.

त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले होते. पंतप्रधान मोदींनी २०१६ मध्ये हिमाचलच्या किन्नौरमध्ये भारत – चीन सीमेजवळ जवानांसोबत दिवाळी साजरी केली. २०१७ साली पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरच्या गुरेजमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

२०१८ मध्ये मोदींनी भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांसोबत उत्तराखंडच्या हर्षिलमध्ये दिवाळी साजरी केली. २०१९ साली राजौरीच्या नियंत्रण रेषेवर, २०२० मध्ये जैसलमेरमध्ये लोंगोवाला पोस्टवर तर काल पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरामध्ये