ओडिशातून अग्नी ५ आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
73

संरक्षण दलाने काल संध्याकाळी ७.५० वा. आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या, अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संरक्षण दलासाठी आवश्यक अण्वस्त्रांचे नियंत्रण करणार्‍या ‘स्ट्रटेजिक फोर्स कमांड’ या विभागाने ओडिशा इथल्या ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरुन ही चाचणी केली. अग्नी ५ हे यापूर्वीच विविध चाचण्यांनंतर संरक्षण दलाच्या सेवेत दाखल झाले आहे. ठराविक कालावधीनंतर नियमितपणे केल्या जाणार्‍या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांपैकी काल अग्नी ५ची चाचणी होती.

अग्नी ५ क्षेपणास्त्राची क्षमता पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर अचूकतेने मारा करण्याची आहे. अग्नी ५ हे दीड टनाएवढा दारुगोळा किंवा अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. अग्नी ५ मुळे याआधीच संपूर्ण चीन हा मारक टप्प्यात आला आहे. जगात मोजक्या देशांकडे एवढ्या दूरपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.