>> चोवीस तासांत ६० बाधितांची नोंद
गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले नवे ६० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून एका कोरोना रुग्णाचा बळी गेला आहे. काल गुरूवारी राज्यात कोरनासाठी ४७७६ जणांची स्बॅव चाचणी करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३३२३ एवढी आहे. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ७७९ झाली आहे. राज्यातील कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ४ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ११ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या ४९ आहे.
मडगावातील रुग्णसंख्येत घट
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असले तरी ती संख्या १०० पेक्षा खाली आहे. सध्या मडगावात कोरोनाची रुग्णसंख्या ७६ एवढी आहे. त्या खालोखाल पणजी ६१ तर फोंडा येथे ५३ रुग्ण आहेत. चिंबल ४७, कांदोळी ४३, काणकोण ३२, कोलवाळ ३१, वास्को व कुठ्ठाळीत प्रत्येकी २८, पर्वरी, कासावली व हळदोणे प्रत्येकी २७, डिचोली २५, म्हापसा २४, अशी रुग्णसंख्या आहे.