देशातील गरिबांच्या खात्यात १ लाख कोटी जमा : मोदी

0
33

केंद्र सरकार गरिबांना आर्थिक मदत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून, आतापर्यंत केंद्राने जवळजवळ १ लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर जमा केले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘न्यू अर्बन इंडिया’ अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि शहरी विकास विभाग तसेच उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदींसह राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
२०१४ च्या आधी जे सरकार होते, त्यांनी शहरांमधील योजनांमध्ये केवळ १३ लाख घरे मंजूर केली. त्यापैकी ८ लाख घरे बनवण्यात आली. पीएम आवास योजनेअंतर्गत १ कोटी १३ लाखांहून अधिक घरांच्या उभारणीसाठी परवानगी दिली, त्यापैकी ५० लाख घरे बांधून पूर्ण झाली, असेही मोदी म्हणाले.