भौतिकशास्त्रासाठीचे नोबेल तिघांना जाहीर

0
44

जपान, जर्मनी आणि इटली या देशांतील तीन शास्त्रज्ञांची भौतिकशास्त्रातील यंदाच्या नोबेल पारितोषिकासाठी निवड झाली आहे. यंदाचा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. स्युकुरो मानाबे आणि क्लाऊस हॅसेलमान यांना दोघांना मिळून अर्धा पुरस्कार, तर जॉर्जियो पॅरिसी यांना अर्धा पुरस्कार जाहीर झाला आहे.

स्युकुरो मानाबे (९०) आणि क्लाऊस हॅसेलमान (८९) यांची पृथ्वीच्या हवामानाचे फिजिकल मॉडेलिंग, वैश्विक तापमानवाढीच्या अंदाजांची अचूकता या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी निवड करण्यात आली आहे. जॉर्जियो पॅरिसी (७३) यांची पुरस्काराच्या दुसर्‍या भागासाठी निवड झाली आहे. त्यांची निवड अणूपासून ग्रहांच्या मापदंडांपर्यंत भौतिक प्रणालींमधील विकार आणि चढ-उतार यांच्या परस्परसंवादाच्या शोधासाठी करण्यात आली आहे.

मानाबे आणि हॅसेलमान यांनी पृथ्वीच्या हवामानाबद्दल आणि त्यावरील मानवांच्या प्रभावाबद्दल संशोधन केले आहे. पॅरिसी यांनी एक संपूर्ण भौतिक आणि गणिती मॉडेल तयार केले असून, जटिल प्रणालींना समजणे सोपे झाले आहे.