आजपासून ५० टक्के क्षमतेने कॅसिनो, मसाज पार्लर्स सुरू

0
45

>> सरकारचा आदेश जारी

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असलेले कॅसिनो, स्पा, जलक्रीडा व जलसफरी, मसाज पार्लर्स, वॉटर पार्कस्, एंटरटेन्टमेन्ट पार्क आदी सर्व कोविड नियमांचे पालन करून ५० टक्के क्षमतेने आज सोमवार दि. २० सप्टेंबरपासून सुरू करण्यासाठीचा आदेश काल सरकारने जारी केला. तसेच या कॅसिनो, स्पा व मसाज पार्लर्समध्ये क्षमतेच्या ५० टक्केच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. ज्या लोकांना कोविडची लक्षणे दिसत नाहीत अशा लोकांनाच तसेच ज्यांनी कोविडचे दोन्ही डोस घेतलेले आहेत अथवा ज्यांच्याकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल आहे अशाच कर्मचार्‍यांना व ग्राहकांना आत प्रवेश दिला जाणार आहे.

प्रेक्षागृहे, कम्युनिटी हॉल, जलक्रीडा, वॉटर पार्क, एंटरटेन्टमेन्ट पार्कर्स, सिनेमागृहे आदी ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने सुरू करण्यात येईल. मात्र विद्यालये सुरू करण्यासाठी त्यासाठीची वेगळी एसओपी शिक्षण खाते जारी करेल.

वरील निर्बंध हे पुढील आदेश येईपर्यंत वैध राहतील. परराज्यातून येणार्‍यांना १०० टक्के लसीकरण अथवा आरटीपीसीआर अहवाल तसेच केरळमधून येणार्‍या प्रवाशांना आरटीपीसीआर अहवालाबरोबरच संस्थात्मक विलगीकरण हे चालू राहणार आहे असे या आदेशात म्हटले आहे.