चोवीस तासांत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, ८४ बाधित

0
41

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून बाधा झालेले ८४ रुग्ण सापडले. तसेच गेल्या चोवीस तासांत ७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ७७४ झाली असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२९४ एवढी झाली आहे. काल राज्यात गेल्या चोवीस तासांत ४१७८ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ८ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १६ एवढी आहे.
तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ६८ जणांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ८९ आहे. त्या खालोखाल पणजीत ७७, पर्वरीत ६२, कांदोळी ४२, शिवोली ३७, म्हापसा ३५, कुठ्ठाळी ३३, फोंडा ३१, चिंचिणी ३० अशी रुग्णसंख्या आहे.
राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७१,४३० एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७५,४९८ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १२,९९,६०६ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२२,६३५ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,३४४ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

देशात ३० हजार बाधित

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ७७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारच्या रुग्णसंख्या तुलनेत जवळपास १३.७ टक्क्यांनी रुग्णसंख्या कमी झाली असून यामुळे देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यासोबत देशातील आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर २.४ टक्के झाला असून गेल्या ८६ दिवसांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात ३८ हजार ९४५ रुग्ण बरे झाले असून ३०९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात सध्याच्या घडीला ३ लाख ३२ हजार १५८ सक्रीय रुग्ण असून एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३४ लाख ४८ हजार १६३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ७१ हजार १६७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून ४ लाख ४४ हजार ८३८ जणांचा मृत्यू झाला आहे.