संकटात सापडलेल्या महिलांसह कुणालाही तात्काळ मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी मोबाईलमधील ‘पॅनिक बटन’चा वापर केल्यानंतर ११२ ही वाहिनी सेवा विनाविलंब उपलब्ध व्हावी म्हणून या सेवेच्या लाईन्स ७ वरून ३० पर्यंत वाढवण्यात आल्या असल्याचे उपमहानिरीक्षक रुपेंदरकुमार यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
नव्या स्मार्ट ङ्गोननाच ‘पॅनिक बटन’ची सोय आहे. स्मार्टङ्गोनला उजव्या दिशेने जे बटन असते ते बटन तीन वेळा दाबल्यास ते पॅनिक बटन ठरते. जर तुम्ही शत्रूच्या अथवा गुन्हेगाराच्या ताब्यात असाल किंवा तुमचे कुणी अपहरण केलेले असेल तर त्या व्यक्तीला न कळता तुम्ही पॅनिक बटन दाबू शकता, असे कुमार यांनी स्पष्ट केले. पॅनिक बटन दाबल्यानंतर तुम्ही पोलिसांशी बोलू शकता. सध्या पॅनिक बटन दाबल्यास १०० या क्रमांकावर कॉल जातो. पण लवकरच ही सेवा ११२ या क्रमांकावर उपलब्ध असेल, ते म्हणाले.
मुलांमुळे वाढता गोंधळ
काही लोक आपले ङ्गोन मुलांकडे देत असतात. काही वेळा मुले उजव्या बाजूचे बटन दाबत राहतात. ३ वेळा ते बटन दाबले गेल्यास १०० वर पॅनिक बटनचा कॉल जातो. सध्या मुलांमुळे चुकून अशा प्रकारे जाणार्या कॉल्सची संख्या २५ हजारांच्या आसपास असल्याचे कुमार यांनी सांगितले. ज्या मोबाईलधारकांच्यामोबाईलवरून पुन्हा पुन्हा त्यांच्या मुलांमुळे पॅनिक बटन दाबल्याने कॉल्स जात असतात त्यांना काळजी घेण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने पॅनिक बटन दाबला गेल्यास पोलिसांची १०० ही टेलिङ्गोन वाहिनी सतत व्यस्त राहत असते. त्यामुळे जर संकटात असलेल्या एखाद्या व्यक्तीने पॅनिक बटन दाबला तर वाहिनी व्यस्त असल्याने कॉल लागत नसतो. त्यामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तीला वेळीच मदत न मिळण्याची भीती असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.