खोर्जुर्वे किल्ल्यावर १४ रोजी ‘हेरिटेज

0
101

गोवन ङ्गॉर एज्युकेशन, गोयचे युवा राखणदार आणि सोबित गोवा सांस्कृतिक ङ्गौंडेशन, पालये-उसकई यांच्या विद्यमाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या जतन संवर्धनासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने १४ मे रोजी खोर्जुवे (हळदोणा) किल्ल्यावर ‘हेरिटेज जत्रा’ भरविण्यात येणार आहे.
या संदर्भात प्रा. प्रजल साखरदांडे, कपिल कोरगावकर, तेजस पंडित, गुरुदास बाले, मासिक दालमिया यांनी काल पत्रकार परिषदेत माहिती दिली. प्रा. साखरदांडे यांनी सांगितले की, आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो जपण्यासाठी तरुणांनी चळवळीत उतरायला हवे व गोव्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे जपण्यासाठी जी मोहीम असेल ती पुढे न्यायला हवी. कपिल कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली ‘हेरिटेज जत्रा’ उपक्रम प्रथमच खोर्जुवे किल्ल्यावर होत आहे.
कपिल कोरगावकर म्हणाले, खोर्जुवे किल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. किल्ला सोडून सभोवतालचा विकास करण्यात येत आहे. आम्ही दरवर्षी किल्ल्यावर वाढणारी झाडे व तेथील अस्वच्छता दूर करण्याचा प्रयत्न करतो. या जत्रेच्या निमित्ताने १६ वर्षांवरील वयोगटासाठी छायाचित्र (फोटोग्राफी) घेण्यात येणार असून जागृती करणारे ४४ पोस्टर्स लावले जातील. किल्ल्यावर काळोख आहे तिथे त्या दिवशी विजेची सोय करण्यात येईल. कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून जत्रेचा खर्च करण्याचे निश्‍चित केले आहे.
तेजस यांनी सांगितले, की आजची पिढी पाश्‍चात्य संस्कृतीकडे आकर्षित होत आहे. आपली संस्कृती टिकवायला हवी. या जत्रेत पारंपरिक खाजे बनविणारे लोक, ङ्गुलांचे गजरे (ङ्गात्या) बनविणार्‍या बाया, आदींना सहभागी होता येईल. यानिमित्ताने १६ वर्षांखालील व १६ वर्षांवरील अशा गटात चित्रकला स्पर्धाही घेण्यात येईल. गुरुदास बाले यांनी जत्रेत ङ्गुगडी, घुमट आरती, मांडो यासारखे पारंपरिक लोककला व लोकसंगीत प्रकारही सादर होतील अशी माहिती दिली.

किल्ल्यांचे खाजगीकरण नको
गोव्यात एकूण बेचाळीस पुरातन किल्ले आहेत. पैकी सात चांगल्या स्थितीत आहेत तर काही ङ्गक्त अवशेष रुपात आहेत. चंद्रपूर या चांदर येथील किल्ल्याची ङ्गक्त भिंतच दिसते. या किल्ल्यांचे खाजगीकरण होऊ देता कामा नये असे प्रा. प्रजल साखरदांडे म्हणाले.