भारताच्या स्वातंत्र्यदिनाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत हे यंदाचे वैशिष्ट्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण झाले. या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करतो असे सांगून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, पालकांना, आपल्या प्रतिभावान मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील कला गुणांना वाव द्या असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रपतींनी टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून ते बोलत होते.
पुढे बोलताना राष्ट्रपतींनी, कोरोनाचा प्रादुर्भाव जरी देशभरातून कमी झालेला असला तरी त्याचा प्रभाव कमी झालेला नाही. डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मर्यांमुळे दुसरया लाटेवर नियंत्रण आले आहे. मात्र प्रत्येक नागरिकाने कोरोना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.